Pimpri : पिंपरी-चिंचवडचा रुपेश चव्हाण ठरला ‘खासदार श्री-2019’ चा मानकरी

एमपीसी न्यूज – पश्चिम महाराष्ट्र राज्यस्तरीय शरीरसौष्ठव ‘खासदार श्री 2019’ स्पर्धेचा मानकरी पिंपरी-चिंचवडचा रूपेश चव्हाण ठरला. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त संत तुकारामनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे हजारो क्रीडाप्रेमींच्या उपस्थितीत ही स्पर्धी पार पडली. शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

या स्पर्धेत पिंपरी चिंचवडच्या रुपेश चव्हाण याने खासदार श्री-2019 हा किताब पटकावला. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी बेस्ट पोजर अतुल साळुंखे (पुणे), मोस्ट इंप्रूड राजेंद्र जाधव (कोल्हापूर), अपकमिंग बॉडी बिल्डर तुषार चोरगे (पिंपरी चिंचवड) यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संघटक जितेंद्र ननावरे यांनी स्पर्धेचे आयोजन केले. महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे राजेश सावंत, प्रणव मुजुमदार, विजय मोरे, संजय महाडिक यांनी पंच म्हणून काम पहिले. विभागप्रमुख राजेश वाबळे, भोलाराम पाटील, रवींद्र ओव्हाळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्क नेते बाळाभाई कदम, शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, महापालिका गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक निलेश बारणे, सचिन भोसले, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, पुणे जिल्हा संघटिका उर्मिलाताई काळभोर, उपशहरप्रमुख रोमी संधू, तुषार नवले, माजी नगरसेवक किरण मोटे, संतोष सौंदणकर, उद्योजक संतोष बारणे, निलेश भोसले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.