Pimpri : एस. के. आर्ट्स प्रोडक्शनचा 17 वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज- एस के आर्ट्स प्रोडक्शनचा 17 वा वर्धापन दिन बुधवारी, 1 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे मोठया उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात एस के आर्ट्स च्या कलाकारांनी सादर केलेल्या सांस्कृतिक उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे उदघाट्न अखिल भारतीय आकाशवाणी व दूरदर्शन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब बोराटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष कमलेश शिनलकर उपस्थित होते. या कार्यक्रमात

_MPC_DIR_MPU_II

या कार्यक्रमासाठी एस के आर्टस् प्रोडक्शनचे पुणे, मुंबई, उरण, ठाणे, कल्याण, नाशिक, नगर, नांदेड, कोल्हापूर, लातूर, सातारा दौंड व बारामतीहून चित्रपट कलावंत आले होते. यावेळी ‘रायझिंग स्टार ऑफ द एस के आर्ट्स प्रोडक्शन” हा विशेष सन्मान मुंबई शाखा प्रमुख अभिनेते आनंद ठक्कर यांना प्रदान करण्यात आला. तसेच 20 निर्माते व दिग्दर्शक यांचाही सन्मान करण्यात आला. एस के आर्टस् प्रॉडक्शनच्या 2020 या वर्षासाठी नवीन नवीन कार्यकारिणी व डिस्ट्रिक प्रमोशन हेड यांची नियुक्ती करण्यात आली

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस के आर्टस् प्रोडक्शनचे संस्थापक अध्यक्ष दिग्दर्शक शिवा बागुल यांनी केले. सूत्रसंचालन पूर्णिमा भोर व आकाश थोरात यांनी केले. आभार एस के आर्टस् चे मुख्य कार्यकारी अधिकारी संगीतकार पराग फडकर यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1