Pimpri : सचिन भैय्या लांडगे, महादेव नलावडे यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – आमदार पैलवान महेश लांडगे यांचे बंधू सचिन भैय्या लांडगे यांची टाटा मोटर्स युनियन अध्यक्षपदी आणि महादेव नलावडे यांची ग्राहक प्रबोधन समिती पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी निवड झाली. याबद्दल त्यांचा ओम साई कॉलनी मित्र मंडळ तसेच सामाजिक कार्यकर्ते आनंद फुले (गुलाब), सुधीर बुडै यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सत्कार करण्यात आला.

तसेच भैय्या लांडगे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री लक्ष्मण पाटील (मामा), (ग्राहक प्रबोधन समिती पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष) यांनी मान्यवरांचे आभार मानले.

तसेच आबा लांडगे, विकास कोळेकर, संदीप भोसले, कोकण मित्र मंडळ यांच्या तर्फे मान्यवरांचे आभार मानण्यात आले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.