Pimpri: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी चिखले यांची फेरनिवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षपदी सचिन चिखले यांची फेरनिवड करण्यात आली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज (मंगळवारी) ही नियुक्ती केली आहे.

राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी शहरातील पदाधिका-यांची बैठक झाली आहे. या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे, पिंपरी-चिंचवड शहराचे प्रभारी किशोर शिदे, गणेश सातपुते, रणजित शिरोळे उपस्थित होते .

 • अशी आहे कार्यकारिणी :
  सचिन चिखले – शहराध्यक्ष,
  विशाल मानकरी – उपशहराध्यक्ष-भोसरी विधानसभा,
  बाळा दानवले – उपशहराध्यक्ष-पिंपरी विधानसभा,
  राजु सावळे – उपशहराध्यक्ष- चिंचवड विधानसभा,
  राहुल जाधव – सचिव – पिंपरी-चिंचवड शहर,
  रुपेश पटेकर – सचिव,
  अंकुश तापकिर – विभाग अध्यक्ष – भोसरी विधानसभा,
  दत्ता देवतरासे – विभाग अध्यक्ष – पिंपरी विधानसभा,
  मयुर चिंचवडे- विभाग अध्यक्ष- चिंचवड विधानसभा,

त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये नव्याने महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना चालू करण्यात आले आहे. या सेनेच्या अध्यक्षपदी रुपेश पटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

HB_POST_END_FTR-A2
You might also like