Pimpri : उपमहापौरपदी सचिन चिंचवडे

एमपीसी न्यूज – पिंपरी -चिंचवड शहराच्या उपमहापौरपदी सत्ताधारी भाजपचे सचिन चिंचवडे यांची निवड झाली. आज विशेष सर्वसाधारण सभेत पार पडलेल्या निवडणुकीत चिंचवडे यांना 79 मते पडली. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विनया तापकीर यांना 32 मते पडली.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत 111 नगरसेवकांनी मतदान केले. त्यामध्ये भाजपचे सचिन चिंचवडे यांना 79 मते पडली. तर, राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांना 32 मते पडली. तर, शिवसेनेने तटस्थ राहत मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला नाही.

सचिन चिंचवडे हे वाल्हेकरवाडी प्रभागातून पहिल्यांदाच भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना उपमहापौरपदी काम करण्याची संधी मिळाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.