Pimpri: महापालिकेतील भ्रष्टाचारी पदाधिकारी व अधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – सचिन साठे

महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ असंघटीत कामगार काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने संत तुकारामनगर पिंपरी येथे उभारण्यात आलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरुस्तीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. तसेच प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर सभागृहाचे बांधकाम पूर्ण झालेले असतानाही कोट्यवधी रुपयांच्या वाढीव खर्चास मान्यता देणा-या महापालिकेतील भ्रष्टाचारी पदाधिकारी व अधिका-यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केली.

पिंपरी चिंचवड असंघटीत कामगार काँग्रेसच्या वतीने गुरुवारी ( दि. 19) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.

यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव संग्राम तावडे, असंघटीत कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, महिला अध्यक्षा शीतल कोतवाल, उपाध्यक्ष नितीन पटेकर, ड्रायव्हर काँग्रेस संघटनेचे अध्यक्ष नवनाथ डेंगळे, रमजान आत्तार, तारीक सय्यद, पिंपरी उपाध्यक्षा संजणा कांबळे, सचिव वंदना आराख, राजश्री वेताळे, तिफन्ना काळे, तोफा पवार, जया आराख, रोशन शेख, अनिता रूपटक्के आदींसह शेकडो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.