Pimpri : सिंधी समाजाच्या संत दादी सतीबाही यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील सिंधी समाजाच्या संत दादी सतीबाही यांचे रविवारी (दि. 22) निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या. सोमवारी (दि. 23) सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर पिंपरी स्मशान भूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.

प्रेम प्रकाश मंदिर पिंपरी येथील संत दादी सतीबाही यांचे निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या किरकोळ आजारामुळे अंथरुणाला खिळल्या होत्या. वृद्धापकाळामुळे त्यांची प्रकृती खालावली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत आज, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास मालवली.

टोपनदास कुकरेजा यांनी पिंपरी येथे प्रेम प्रकाश मंदिराची 50 वर्षांपूर्वी स्थापना केली. तेव्हापासून दादी सतीबाही मंदिरात सेवा करत होत्या. दररोज नियमितपणे मंदिरात आरती केली जात असे. तसेच मंदिरातील सर्व सेवा त्या करत होत्या. सोमवारी सकाळी अकरा वाजता प्रेम प्रकाश मंदिर येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यानंतर, पिंपरी स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.