Pimpri : निवृत्त मुख्याध्यापक एस. आर. शिंदे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक आणि भोसरी गावचे रहिवासी सहदेव राणूजी ऊर्फ एस. आर. शिंदे यांचे अल्पशा आजाराने बुधवारी (1 मे) सायंकाळी निधन झाले. ते 72 वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुली, एक मुलगा, जावई, सून, नातू असा परिवार आहे.

एस. आर. शिंदे यांनी अनेक वर्षे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका गणेशोत्सव स्पर्धा समितीवर परीक्षक म्हणून काम पाहिले. शिंदे सर यांचे मुळगाव उदापूर, तालुका जुन्नर आहे. भोसरीतील संत सावतामाळी मंदिर उभारणीत तसेच शेकडो विवाह जुळविण्यात मोठे योगदान आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचे पुणे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले आहे.

  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांचे ते दाजी होत. एस. आर. शिंदे यांचा अंत्यविधी आज गुरुवारी (2 मे) सकाळी 9 वाजता भोसरीत तळ्याकाठी होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.