Pimpri : भारतीय छात्र संसद-कोल्हापूर जिल्हा समन्वयकपदी साहिल भाट यांची निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडचे विद्यार्थी साहिल अंबादास भाट यांची भारतीय छात्र संसदच्या कोल्हापुर जिल्हा समन्वयक म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

भारतीय छात्र संसद हे राजकारणात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाने उपलब्ध करुन दिलेल सगळ्यात मोठ व्यासपीठ आहे. यामध्ये सबंध देशभरातील 60 हजार पेक्षा जास्त राजकारणात रस असलेले विद्यार्थी, विद्यार्थ्यांसोबत 200 वैचारिक नेते, 60 आमदार, 40 खासदार, 14 कुलगुरुंचा सहभाग असलेली 3 दिवसीय शिबिर दरवर्षी आयोजित करण्यात येते. आणि या सर्व विद्यार्थ्यांमधून जिल्हा समन्वयक पदासाठी आलेल्या अर्जामधून पिंपरी चिंचवड मधील अत्यंत सामान्य कुटुंबातील पण अभ्यासू साहिल भाट यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल समाजातील सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

साहिल भाट याने प्राथमिक शिक्षण एच.ए.स्कुल, पिंपरी व माध्यमिक शिक्षण छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालय, चिंचवड येथून तर संगणक अभियांत्रिकी-डिप्लोमा पदवी डी. वाय.पाटील पॉलिटेक्निक कॉलेज,आकुर्डी येथून पूर्ण केली आहे. तो सध्या डी. वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग येथे बी.ई.चे शिक्षण घेत आहे. मागील वर्षीसुद्धा साहिल याने पुणे-जिल्ह्याचे नेतृत्व केले होते.

“शिक्षणात अत्यंत आमूलाग्र बदल करायचे असतील तर युवकांनी राजकारणात यायला हवे ” या विचारावर साहिलचा विश्वास आहे. राजकारणात रस असणारे अभ्यासू चेहरे पुढे आणण्यासाठी समन्वयक पदाचा वापर त्यांना करायचा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.