Pimpri : जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत साई बाचकरला सुवर्णपदक; तर ओंकार बामणेला ब्राँझपदक

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा क्रीडा विभाग आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्तपणे ठाकरे क्रीडा संकुल, पिंपरी येथे सुरू असलेल्या शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी साई बाचकर याने (60/65 वजनगट) आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदकाची कमाई केली.

त्याच्या या उत्कृष्ट खेळीमुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याबरोबरच लिटल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूलच्याच ओंकार बामणे (50/55 वजनगट) या विद्यार्थ्याने ब्राँझपदक पटकावले.

या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक रामेश्वर हराळे यांचे मार्गदर्शन मिळाले.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, तेजल कोळसे पाटील, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आदींनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.