Pimpri : पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यातील सलून, व्यायामशाळा आठवडाभरात सुरु होणार

Salons and gymnasiums in the state including Pune and Pimpri Chinchwad will start within a week सलूनमध्ये फक्त केस कापण्यास परवानगी देण्यात आली आहे. दाढी करण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एमपीसीन्यूज : पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील सलून ( केशकर्तनालय ) आणि व्यायामशाळा येत्या आठवडाभरात पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय आज, गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मात्र, सध्या ब्युटी पार्लर आणि स्पाला परवानगी देण्यात आलेली नाही.

मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यभरातील सलून ( केशकर्तनालय ) आणि व्यायामशाळा येत्या आठवडाभरात पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. याबाबतची नियमावली आणि मार्गदर्शक तत्वे दोन दिवसांत आखून दिली जातील, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी ट्ववीट करून दिली आहे.

दरम्यान, सलून व्यावसायिकांना सोशल डिस्टंसिंगचे पालन, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. सलूनमध्ये फक्त केस कापण्यास परवानगी देण्यात आली आहे. दाढी करण्यास परवानगी देण्यात आली नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयाने राज्यभरातील सलून व्यावसायिक आणि नियमित व व्यायाम करणाऱ्या व्यायामपटूंमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याचबरोबर सलून व्यावसाईक आणि नाभिक समाजाच्या विविध संघटनांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

लॉकडाऊनच्या जवळपास तीन महिन्यांपासून राज्यभरातील सर्व सलून व्यवसाय बंद होता. त्यामुळे सलून व्यावसायिकांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले. शिवाय या व्यवसायात काम करणाऱ्या कारागिरांचे प्रचंड हाल झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.