Pimpri: सॅल्यूट ! सांगवीतील 330 ब्रिगेडच्या मिलिटरी पथकाने दिला 100 कुटुबियांसाठी शिधा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने केलेल्या आवाहनाला विविध सेवाभावी संस्थांनी सहयोगाचा हात दिला असून, औंध -सांगवी येथील 330 ब्रिगेडच्या मिलिटरी पथकाने सुमारे शंभर कुटूंबांसाठी आवश्यक शिधा आज (सोमवारी) इंद्रायणीनगर येथील क्रीडा संकुलात महापालिका पथकाकडे सुपूर्द केला. यामध्ये तांदूळ, तूरडाळ, मसाला, तेल, कांदे, बटाटे व मीठ यांचा समावेश आहे.

कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या लॉकडाऊन चालू आहे. त्यामुळे मजूर ,कामगार, बेघर व प्रवासामध्ये अडकलेल्या नागरिकांना निवारा व भोजनाची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यासाठी विविध सामाजिक संस्था व संघटना व व्यक्ती यांना मदत करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. दरम्यान, इस्कॉन, बजाज ग्रूप मार्फत शहरातील पंधरा हजार सातशे नागरिकांना खिचडीचे वितरण करण्यात आले.

शिधा देण्यासाठी इच्छूक व्यक्ती,संस्था अथवा कारखानदार यांनी अभिषेक पाटोळे ८९७५८८८३४५ यांच्याशी संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल इंद्रायणीनगर भोसरी येथे संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.