Pimpri: शालेय ‘फी’साठी सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

Pimpri: Sambhaji Brigade demands action against schools for forcing school fees लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग, व्यवसाय बंद आहेत. परिणामी बंदमुळे संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि उपजिविकेची साधने बंद आहेत.

एमपीसी न्यूज- शालेय शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून काही खासगी शाळांकडून पालकांना फी भरण्याची सक्ती करत आहेत. राज्य सरकारने शाळांनी शालेय फी भरण्याची सक्ती करुन नये. असा आदेश असतानाही पालकांकडे फीचा तगादा लावला जात आहे. अशा शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आली आहे.

याबाबत शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोविड-19 या विषाणुमुळे देशात व राज्यात लॉकडाऊन जाहीर केले होते.

लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग, व्यवसाय बंद आहेत. परिणामी बंदमुळे संपूर्ण आर्थिक व्यवहार आणि उपजिविकेची साधने बंद आहेत.

अशा परिस्थितीत शहरातील इंग्रजी माध्यमातील खासगी व विनाअनुदानित अनेक शाळांकडून ऑनलाईन क्लासेसचा बहाणा करून शाळा सुरू झाल्याचे सांगून पालकांना संपूर्ण फी ची रक्कम भरायला भाग पाडले जात आहे. अशा प्रकारच्या पालकांच्या अनेक तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आलेल्या आहेत.

निवेदन देताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश काळे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद गोतारणे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.