BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: अनाथ मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ संभाजी बिग्रेडची निदर्शने

एमपीसी न्यूज – उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहरा तालुक्यातील हराळी येथील अल्पवयीन अनाथ मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने आज (सोमवारी) पिंपरीत निदर्शने केली. आरोपींची सीबीआय चौकशी करुन, त्यांना कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, सुनील साळुंके, पांडुरंग प्रचंडराव, रफिक कुरेशी, साहेबराव साळुंके, किरण माने, अशोक सातपुते, निलेश मुसळे, सुरज साळुंके, डॉ. सहास जगदाळे, धनंजय घावटे, केशव पाटील, सतीश काळे, सतीश घावटे, मोहसिन शहा, तेजस गवई, रफिक सय्यद, श्रीहरी रसाल, अक्षय मरबे सहभागी झाले होते.

  • यावेळी अभिमन्यु पवार म्हणाले, ”देशभरातील महिला असुरक्षित असून कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे. हराळी येथील घटनेत आरोपींना पाठीशी घातले जात आहे. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. कारण हा प्रकार शिक्षकी पेशाला आणि शिक्षण व्यवस्थेला काळीमा फासणारा आहे. तसेच, या संस्थेला वस्तीगृहाची मान्यता नसताना शेकडो अनाथ आणि निराधार त्या ठिकाणी आहेत. यामुळे या घटनेतील आरोपींना कडक शासन करावे”, अशी मागणीही त्यांनी केली.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3