Pimpri : भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी संदीप कांबळे यांची निवड

एमपीसी न्यूज- भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या महाराष्ट्र अजय दलित मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी संदीप कांबळे (गुरुजी) यांची निवड करण्यात आली आहे.

राम गोपाळ सिंग चौहान( राष्ट्रीय अध्यक्ष बी.डी.पी) यांनी कांबळे यांना आपल्या देशभक्ती, समाजसेवा आणि भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या प्रति समर्पित निष्ठाभाव असलेल्या कार्याचा सन्मान म्हणून या पदी नियुक्त करत असल्याचे नियुक्तीपत्र दिले.

“भारतीय धर्मनिरपेक्ष पार्टीच्या उद्देशासाठी तसेच देशसेवा आणि समाजसेवेसाठी मी नेहमी मी नेहमी तत्पर आहे” असे संदीप कांबळे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.