BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: पूरग्रस्तांसाठी महापालिकेने डॉक्टरांचे पथक पाठवावे ; नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी 

एमपीसी न्यूज – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत चालली आहे. पाणी कमी होण्यास सुरुवात झाली असून आता साथीचे आजार पसरण्याची भिती आहे. त्यासाठी पिंपरी महापालिकेने औषधसाठ्यासह डॉक्टरांचे पथक पाठविण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात वाघेरे यांनी म्हटले आहे की, पश्चिम महाराष्ट्रमध्ये पावसाने थैमान घातले असून याचा फटका अन्य भागापेक्षा कोल्हापूर व सांगली भागातील नागरिकांना बसला आहे. या भागातील पाणी काहीसे कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुराच्या पाण्यामुळे साथीच्या रोगाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच पुराच्या पाण्यामुळे मानवी वस्तीत साप शिरल्याच्याही घटना घडलेल्या आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून पिंपरी महापालिकेमार्फत माणुसकीचा हात म्हणून वायसीएमएच व अन्य रुग्णालयातील डॉक्टरांचे व मदतनीसांचे एक पथक कोल्हापूरला पाठविण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णवाहिका, सर्पदंशावरील लस, लेप्टो रोगाचा संभाव्य धोका ओळखून डोक्सिसिन व अन्य आवश्यक औषधे पाठविण्यात यावीत, अशी विनंती वाघेरे यांनी केली आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3