BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ग्रामीण भागातील खऱ्या नायकांची जगाशी ओळख करून देणारा संदीप यादव (व्हिडिओ)

(मीनल महाजन)

एमपीसी न्यूज- सोशल मीडिया आता जगण्याचा भाग बनला आहे. युवा पिढीसाठी एक व्यक्त होण्याचे व्यासपीठ असा या माध्यमाचा वापर सर्रास होताना दिसतो. असाच एक मास कॉओंम मिडिया कॉलेजच्या विद्यार्थ्याने याच समाजातील खऱ्या हिरोना जास्तीजास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावच्या संदीप यादव या तरुणाने. संदीपच्या या कार्याची दखल घेऊन यु ट्यूब ने त्याला सिल्वर प्ले बटण आणि मानचिन्ह देऊन मानाची थाप दिली.

हे काम करण्यासाठी त्याने स्वतःच शूटिंग करून स्वतःच्या चॅनेल सँडी यादव या नावाने सुरु केलेल्या चॅनेलच्या माध्यमातून समाजातील हिरोन समाजापुढे आणण्याचे काम केले आहे. प्रत्येक हिरा कोठे राहतो किंवा किंवा कोणत्या जातीचा आहे हे न शोधता तो माणूस म्हणून कसा असामान्य आहे आहे हे त्याने शोधायला सुरवात केली.

संदीपला स्वतःला जेंव्हा वाटलं की एखादा विषय किंवा माणूस या विषयी माहिती गोळा करायला हवी. त्यावेळी त्यातील वास्तव लोकांपर्यंत पोचण्यासाठी त्याने कशाची पर्वा केली नाही. यामधून आपल्याला काय मिळेल किंवा नाही याची तमा बाळगली नाही. वेळप्रसंगी तो सर्व गोष्टी पार करून समाजातील त्या हीरोना अधिक समजून घेऊ लागला.

मुळातच सतत नवीन शोधण्याची कल्पकता, काहीतरी नवीन करण्याची धडपड यामधून केलेल्या कार्याची अमेरिकेच्या यु ट्यूबने देखील दखल घेतली. एका वर्षीय त्याच्या यु ट्यूब चॅनेलला तब्बल १ लाख ४० हजार सब्स्क्रायबर्स आणि तब्बल २ कोटी ७० लाखापेक्षा जास्त व्यूअर्स मिळाले. त्याबद्दल यु ट्यूबने त्याला सिल्वर प्ले बटण आणि मानचिन्ह देऊन कौतुक केले.

ग्रामीण भागातील परंपरा जपणाऱ्या अनेक थोरामोठ्यांना त्याने सातासमुद्रापलीकडे नेऊन त्यांचे नाव बांगलादेश, कुवेत, सौदीअरेबिया, दुबई, मलेशिया, अमेरिका इ. देशामध्ये पोहोचवले. या सर्व कामाचे श्रेय तो आपल्या कुटुंबाला देतो. शिवाय कॉलेजमधले प्रा. मिस्त्री, वृत्तवाहिन्यांच्या अनुभवातून तो घडत गेला असे तो म्हणतो.

सँडी एन यादव हे यु ट्यूब चॅनेल सध्या तुफान लोकप्रिय आहे. त्यात अशिक्षित असूनही रेडिओ जॉकी झालेल्या केराबाई, प्रसिद्ध समालोचक शंकर अण्णा गुरव, बैलगाडी शर्यतीमध्ये खाली मान घालून सदैव जिंकणारा ‘लक्ष्या बैल’, मल्ल राहुल आवारे, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, वरिष्ठ पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे यांची ओळख जगाला करून देणारे व्हिडीओ सध्या लोकप्रिय होत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3