Pimpri: शिवशाही वाहतूक आघाडीच्या कोकण प्रदेश अध्यक्षपदी संगम जाधव यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज- शिवशाही व्यापारी संघ प्रणित शिवशाही वाहतूक आघाडीच्या कोकण प्रदेश अध्यक्षपदी संगम आनंद जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवशाही वाहतूक आघाडी प्रदेशाध्यक्ष विनोद खांडेकर यांच्या सूचनेने व शिवशाही व्यापारी संघ खोपोली शहराध्यक्ष अल्ताप मनसुरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली.

संगम जाधव यांच्या निवडीची घोषणा संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी आज (शनिवारी) पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयातून केली. संगम जाधव यांना व्यापारी वर्ग, सर्वसामान्य जनता, तृतीयपंथी, दिव्यांग माताभगिनींच्या सेवेसाठी तत्पर राहण्याची तसेच चालक व मालक या वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध राहण्याची सूचना युवराज दाखले यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.