Pimpri : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जोरदार तयारी

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी कसली कंबर

एमपीसी न्यूज – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षबांधणी करणे, कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटून देणे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावर भर देण्यात आला आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या राष्ट्रवादी युवक कांग्रेसने नव्या जोमाने पक्षबांधणीची सुरुवात केली आहे. एक बुथ दहा बुथ हा प्रयोग अंमलात आणण्यात येणार आहे.

याबाबत बोलताना संग्राम कोते पाटील म्हणाले, ” राज्यातील प्रत्येक नागरिकाचा डेटा जमा करण्यात आला असून त्यानुसार पक्षाची ध्येयधोरणे व विचारधारेचा प्रसार व प्रचार करण्यावर भर देणार आहे. स्थानिक पदाधिका-यांची टीम तयार करुन त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. युवकांना पक्षाच्या प्रचार प्रसारात सामावून घेण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. अत्याधुनिक साधनांचा वापर करुन पक्षसंघटना बांधण्यावर भर देणार असून सोशल मिडियातून अधिक प्रभावी प्रचार करण्यास प्राधान्य देणार आहे ”

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नुकतेच पश्चिम महाराष्ट्र- उतर महाराष्ट्र, विदर्भ, कोकण अशा चार ठिकाणी विभागनिहाय मेळावे घेण्यात आले असून या मेळाव्यास युवकांचा प्रतिसाद उत्स्फूर्त मिळाला अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक उपाध्यक्ष विशाल काळभोर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.