Pimpri : संजय राऊत यांचे ‘ते’ कृत्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज – डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे 2014 पासून खासदार  (Pimpri) आहेत. त्यांच्याविषयी संजय राऊत यांनी अतिशय लज्जास्पद वर्तन केले आहे. ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे आहे. एखादा नेता अशा प्रकारे माध्यमांसमोर थुंकतोय हे अशोभनीय आहे, अशी टीका मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.

द्वेषापोटी एखाद्या नेत्याने किती खालची पातळी गाठली आहे. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेतल्यानंतर अक्षरशः राऊत थुकले आहेत. अंगांत किती द्वेष आहे. राऊत यांना गर्व झाला आहे. रोज माध्यमांचे प्रतिनिधी घरात जातात, त्यांना प्रसिद्धी देतात. तो वेगळ्या प्रकारचा गर्व त्यांना झाला आहे.

Maval : निवडणूक डोळ्यापुढे ठेवून मी काम करत नाही – श्रीरंग बारणे

श्रीकांत शिंदे हे संजय राऊत यांच्या मुलासारखे आहेत. त्यांनी राऊत यांना कायमच आदर दिला आहे. असे असतानाही (Pimpri) थुंकणे राऊत यांना शोभत नाही. ते एक पत्रकार आहेत. खासदार म्हणून काम करत आहेत. त्यांच्या थुकण्याच्या मी जाहीरपणे निषेध करतो. असले कृत्य महाराष्ट्राची जनता सहन करून घेणार नाही. मी राऊत यांचा निषेध करतो, असेही बारणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.