BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘पाणी वाचवा’ जनजागृती अभियानात विद्यार्थ्यांनी दिला पाणी वाचविण्याचा संदेश

0 65
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंंचवड शहर आणि साई कॉम्प्यूटर म्हेत्रे वस्ती चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवारी पाणी वाचवा जनजागृती अभियान राबविण्यात आले.

म्हेत्रे वस्ती टॉवरलाईन रोड, साने चौक, म्हेत्रे गार्डन या परिसरातुन रॅली काढण्यात आली. यामध्ये साई कॉम्प्यूटरचे २०० विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच पालक सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ‘पाणी म्हणजे जीवन, जीवन म्हणजे पाणी’.’थेंब थेंब पाण्याचा माना तो सोन्याचा’,’पाणी आडवा पाणी जिरवा’,’पाण्याचा वापर जपून करा’ अशा विविध घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली या जनजागृती फेरीचे संयोजन डॉ. मोहन गायकवाड आणि प्रा. भाऊसाहेब मातणे यांनी केले.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3