Pimpri : एस.बी. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल संपन्न

एमपीसी न्यूज –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाइनच्या तिस-या वर्षाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल दिल्ली, आग्रा, फतेहपूर, सिक्री आणि चंदीगड येथे नुकतीच जाऊन आली. या सहलीत राष्ट्रीय स्थरावरील कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष विजय गर्ग आणि रजिस्टार ओबेरॉय यांच्या समवेत  विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवन, संसद भवन या दोन महत्वाच्या वास्तू आणि वास्तुकलेच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या स्थळांना भेट दिली.

या शैक्षणिक सहलीत विद्यार्थी व प्राध्यापकांनी आग्रातील ताजमहाल, आग्रा फोर्ट, फत्तेहपूर सिक्रीतील बुलंद दरवाजा, पंच महाल आणि सलीम चिस्ती दर्गा या ठिकाणांना भेट दिली. याबरोबरच दिल्लीतील लोटस टेम्पल, इंडियन हॅबिटॅट सेन्टर, जवाहरलाल नेहरु स्टेडियम या वास्तूंचा अभ्यास केला.

यानंतर भारतातील पहिले सुनियोजित शहर पंजाब व हरियाणाची राजधानी चंदीगड शहराला भेट दिली. व तेथील विविध विकास प्रकल्पांचा, वास्तूशिल्पांचा रचनेचा अभ्यास केला. सुप्रसिध्द वास्तूशिल्पकार (आर्किटेक्ट) ली कॉर्बुझीयर यांनी डिझाइन केलेल्या कॅपिटल कॉम्प्लेक्सला भेट दिली. प्राचार्य डॉ. महेंद्र सोनावणे, प्रा. शिल्पा पाटील, प्रा. अपुर्वा गिजरे, प्रा. अवनी टोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.

तसेच पीसीईटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही.एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी सहाय्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.