Pimpri: शिष्यवृत्ती परीक्षेच्या पुस्तिकेवर साडेबारा लाखांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील पाचवी व आठवीचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसतात. त्या 2 हजार 670 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची अभ्यासपुस्तिका संच खरेदीसाठी 12 लाख 50 हजार रूपयांचा खर्च केला जाणार आहे.

राज्य शासनातर्फे पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी घेतली जाते. पालिका शाळेचे विद्यार्थीही या परीक्षेला बसतात. या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने ते शिष्यवृत्तीची पुस्तिका संच खरेदी करू शकत नाहीत.

त्यामुळे 2019-20 या शैक्षणिक वर्षासाठी त्या होतकरू व गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके खरेदी करून मोफत देण्यात येणार आहेत. या पुस्तक खरेदीचा ठराव शिक्षण समितीने मंजुर केला आहे. या खर्चास स्थायी समिती सभेत मान्यता देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.