Pimpri school News: कोरोना रुग्णसंख्येत वाढ; शहरातील शाळा, महाविद्यालये 13 डिसेंबरपर्यंत बंद

पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा आदेश

एमपीसी न्यूज – कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तसेच शिक्षकांची कोरोना चाचची अद्यापपर्यंत बाकी असल्याने पिंपरी- चिंचवड शहरातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्याचे लांबणीवर गेले आहे. त्यामुळे 13 डिसेंबर 2020 पर्यंत शहरातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग बंद ठेवण्यात येणार आहेत. याबाबतचा आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी काढला आहे. या आधी 30 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले होते. आता त्यामध्ये वाढ करत 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉकमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत 23 नोव्हेंबर पासून राज्यातील नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याचे नियोजन सरकारने केले होते. मात्र, दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने शहरातील परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या सूचना सरकारने दिल्या होत्या.

पिंपरी शहरातील रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने शिक्षकांच्या कोरोनाच्या चाचण्या पूर्ण झाल्या नसल्याने पिंपरी पालिकेने 30 नोव्हेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यामध्ये वाढ करत 13 डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अद्यापर्यंत काही शाळातील शिक्षकांची आरटीपीसीआर, रॅपिड अँटीजेन टेस्ट बाकी आहेत.

सद्यस्थितीत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे महापालिका हद्दीतील नववी ते बारावीचे वर्ग 13 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, शहरातील रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या हद्दीतील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा/ महाविद्यालये उघडण्यासंदर्भात कुठलीही घाई न करता, शहरातील कोरोना रुग्णांची संख्या व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच डिसेंबर महिन्याच्या 13 तारखेनंतरच महापालिका हद्दीतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुलांच्या पालकांवर संमतीने शाळा उघडणे चुकीचे होवू शकते. मुळात शाळा उघडल्याने मुलांच्या आरोग्याशी खेळ करतो की काय? असा प्रश्न पालकांच्या मनामध्ये निर्माण होवू लागला आहे. डिसेंबर महिन्याच्या 13 तारखेपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या व शहरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच शहरातील शाळा सुरू करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.