Pimpri : लाॅकडाऊनमध्ये सुद्धा सुरक्षा रक्षकांचा ‘खडा पहारा’

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे देशात 21 दिवसांच्या लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यामुळे सर्वजण आहे त्याच ठिकाणी अडकून पडले. ज्यांना जमेल तसे त्यांनी आपले गाव गाठले. या सर्व परिस्थितीत सोसायटी, माॅल, बॅंक, एटीएम, सरकारी कार्यालये, बीआरटीएस, औद्योगिक कंपन्या यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले सुरक्षा रक्षक अहोरात्र नेमणूक केलेल्या ठिकाणी खडा पहारा देत आहेत. काही ठिकाणी आठ तास, तर काही ठिकाणी बारा तासांची शिफ्ट करत आहेत.

संचारबंदीत सुद्धा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी तैनात असलेले सुरक्षा रक्षक आपले काम चोखपणे पार पाडत आहेत. औद्योगिक कंपन्या, मॉल, एटीएम यांच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात आहेत. जे बॅचलर सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत त्यांना हॉटेल खानावळ बंद असल्यामुळे जेवणाची अडचण होत असताना देखील पर्यायी व्यवस्था करत ते आपली जबाबदारी पार पाडत आहेत. ऊन, वारा, पाऊस यांची फिकीर न करता नेमून दिलेल्या ठिकाणी आपल्या जबाबदारीची प्रामाणिक अंमलबजावणी करताना दिसत आहेत.

आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत व सामाजिक भान जपत सुरक्षा रक्षक एक प्रकारे देशसेवाच करत आहेत. कोरोना सारख्या साथीच्या आजाराची भीती असताना जीवावर उदार होत ही मंडळी आपली जबाबदारी पार पाडत आहेत. धान्याचे गोदाम, सुपर मार्केट सोसायटी व अन्य ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात असल्याचे दिसून येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.