BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : राज्यस्तरीय प्रदर्शऩासाठी वैष्णवी सगर हिची निवड

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज –  पुणे जिल्हा परिषदतर्फे आयोजित जिल्हास्तरीय प्रकल्पातून तळवडे येथे राजा शिवछत्रपती विद्यालयमधील इयत्ता नववीमधील वैष्णवी प्रकाश सगर या विद्यार्थ्यांनीचा सॅनिटरी नॅपकिन दिस्पोजल मशीन या प्रकल्पाचा राज्यस्तरीय प्रदशर्नासाठी निवड झाली.

प्रकल्प बनविण्यासाठी तळवडे गावचे राजा शिव छत्रपती विध्यालायतील आदर्श व गुणवंत शिक्षक  सुहास चौधरी यांनी मार्गदशन केले.  माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर व स्विकृत सदस्य पांडुरंग गुलाब भालेकर तसेच रुपीनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक रमेश नामदेव भालेकर,तळवडे गावातील सामाजिक कार्यकर्ते सोमेश्वर मेमाणे,कुमार भालेकर, संतोष नखाते, युवराज भालेकर, रामदास कुटे, तुकाराम नखाते, महेश भालेकर उपस्थित होते.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक गोवर्धन चौधरी यांनी कौतुक केले. या विशेष प्रयोगशील विचारांना प्रोत्साहन देण्यासाठी व यशस्वी वाटचालीस विद्यार्थिनींचे व शिक्षकाचे अभिनंदन करण्यात आले.

HB_POST_END_FTR-A4

.