BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – दुर्धर आजाराने ग्रासलेल्या एका वृद्धाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 13) मध्यरात्री दीडच्या सुमारास खराळवाडी येथे घडला.

रुपचंद धोंडीराम सुंदेचा (वय 85, रा. भारतनगर, खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपचंद यांना एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यामुळे ते काही दिवसांपासून नैराश्यात होते. आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये ते १०० टक्के भाजले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3