Pimpri: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन

Senior NCP corporator Javed Sheikh dies due to corona :जावेद शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. आकुर्डी भागातून सलग तीनवेळा ते निवडून आले होते.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख (वय 49) यांचे कोरोनामुळे आज (शुक्रवारी) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई वडील, दोन भाऊ, दोन मुले, सून असा परिवार आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचे 4 जुलै रोजी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर शेख यांच्या निधनाने राष्ट्रवादी परिवाराला हा दुसरा धक्का बसला आहे.

जावेद शेख राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक होते. आकुर्डी भागातून सलग दोनवेळा ते निवडून आले होते. 2007 च्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले होते. 2012 आणि 2017 च्या निवडणुकीतही आकुर्डीतून शेख राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यांनी ‘अ’ प्रभागाचे अध्यक्षपद देखील भूषविले आहे.

शेख यांना 16 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले आहे.

पालिकेतील मोठ्या पदाची इच्छा अपूर्णच !

राष्ट्रवादीच्या चिन्हावर जावेद शेख आकुर्डीगावठाण भागातून सलग  दोनवेळा निवडून आले होते. त्यातील दहा वर्ष पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी त्यांना महापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा पदांनी हुलकाविणी दिली.

2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला विरोधात बसावे लागले. त्यावेळी शेख विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छुक होते. आता चौथ्यावेळी त्यांना संधी मिळण्याची दाट शक्यता होती. पण, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे पालिकेतील मोठ्या पदाची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.