Pimpri : हेंन्कल कंपनी तर्फे सेवा कार्य दिवस

एमपीसी न्यूज- एमआयटी या हेंन्कल कंपनी तर्फे सेवा कार्यात स्वतः स्थापन केलेल्या संस्थेस 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सामाजीक उपक्रम राबविण्यात येत आहेत. पर्यावरण, सायन्स, आरोग्य ही संकल्पना घेऊन जगभरात कार्यक्रम होत आहेत. भारतात प्रति शिर्डी शिरगाव येथील शारदाश्रम मध्ये विविध शाळांतील 350 मुलांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम(Pimpri) झाला.

 

विद्यार्थ्यांनी अवकाश दर्शन लॅब विषयी माहिती, प्रत्यक्ष सूर्य दर्शन, विविध खेळ, पर्यावरण विषयक जागृती , चित्रकला स्पर्धा ईत्यादीत सहभागी घेतला .हेंन्कल मॅनेजर फिलिप लूजण यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या प्रसंगी अनेक देशातील हेंन्कल मॅनेजर , ओमर अबू, सचिन सापार, डॉ प्रसाद खंडागळे साईट मॅनेजर हेन्कल हिंजवडी ,प्रदीप वर्मा,प्रकाश देवळे तसेच मुख्याध्यापक लोखंडे , डॉ विशाल कुंभारे, एन डि ए स्कूल प्रिन्सिपल गुरुजीत कौर , जिल्हा परिषद शिक्षक, गतिमंद शाळा विद्यार्थी, अंध शाळा विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Pune : पुण्यात लुटमारीच्या घटना वाढल्या; शिवाजीनगर आणि कात्रज परिसरात कोयत्याच्या धाकाने लुबाडले

पर्यावरण रक्षणासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तर शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ कशे खेळाचे व कुठल्या प्रकारच्या आहार घ्यावा याचे मार्गदर्शन करण्यात आले.विद्यार्थ्यांना अवकाश दर्शन सोप्या भाषेत समजेल या साठी पुस्तके, चित्रकलेचे साहित्य, खाऊ वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी व त्यांच्या शिक्षकांनी चांगल्या उपक्रमात सहभागी केल्या बद्दल हेंन्कलचे आभार मानले. विकास माने, किर्तिकुमार काटकर, संतोष चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे (Pimpri) नियोजन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.