Pimpri: योगा एशियन चॅम्पियनशिपच्या विजेत्यांना सात लाखांचे अर्थसहाय्य

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे सिंगापूरमध्ये 2017 मध्ये झालेल्या सातव्या योगा एशियन स्पोर्टस चॅम्पिअनशिप स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना सात लाखांचे आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती समोर ठेवण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूस दोन लाख रुपये देण्यात येणार आहेत. यामध्ये सुवर्णपदक विजेत्या नुपुर लक्ष्मण मोरे, रुपाली गणेश तरवडे, चंद्रकांत श्रीरंग पांगारे यांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर 26 व्या जागतिक योगासन स्पर्धा 2018 मध्ये सहभागी झाल्याबद्‌द्‌ल देवदत्त वसंत भारदे एक लाख रुपये देण्यात येणार आहेत.

शहरातील खेळांडूना प्रोत्साहन मिळावे व त्यांना खेळाची तयारी करताना आर्थिक अडचणी येऊ नयेत या हेतूने व समितीच्या धोरणानुसार विजेत्या खेळांडूंना ही आर्थिक मदत करण्यात येते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.