Pimpri : सात वर्षीय चिमुकल्यासह भोसरी, खराळवाडीमधील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी आणि खराळवाडी येथील दोघांचे आज (रविवारी) सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात एका सात वर्षीय मुलाचा समावेश आहे. शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 50 झाली आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, भोसरी आणि खराळवाडी येथील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यात सात वर्षीय मुलाचा आणि 19 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. आज पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असलेल्या 81 वर्षीय महिलेचा पुण्यातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

रविवारी दिवसभरात 10 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांच्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात मोशी येथील एक, रुपीनगर सहा, तपोवन पिंपरी येथील तीन रुग्ण होते.

आजचा वैद्यकीय अहवाल!
# दाखल झालेले संशयित रुग्ण – 201
# पॉझिटीव्ह रुग्ण – 2
# निगेटीव्ह रुग्ण – 113
# चाचणी अहवाल प्रतिक्षेतील रुग्ण – 146
# रुग्णालयात दाखल एकूण संख्या – 323
# डिस्चार्ज झालेले एकूण रुग्ण – 123
# आजपर्यंतची कोरोना पॉझिटीव्ह संख्या – 185
# सक्रिय पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या – 50
# शहरातील कोरोना बाधित आठ रुग्णांवर महापालिका क्षेत्राबाहेरील रुग्णालयात उपचार सुरु
# आजपर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या – 8
# आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या – 82
# दैनंदिन भेट दिलेली घरे – 25234
# दैनंदिन सर्वेक्षण केलेली लोकसंख्या – 75382

  • शहरातील हा परिसर सील !
    हुतात्मा चौक, भोसरी येथील (ज्यू जनता बेकरी, भोसरी आळंदी रोड, श्री बालाजी मंदिर, मार्केट रोड, हरेश्वर किराणा स्टोअर्स, न्यु जनता बेकरी) हा परिसर पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे. या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.