Pimpri : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार; तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना चिंचवड येथे घडली.

आदित्य युवराज पवार (वय 19, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि. 13) घडली. आरोपी याने फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी त्यांच्या घराच्या पाठीमागे खेळत असताना तिला फूस लावून पळवून नेले. त्यानंतर त्याने मुलीवर दोन ते तीन वेळा लैंगिक अत्याचार केला.

याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.