Pimpri News : शब्दधन काव्यमंचचे काव्य पुरस्कार जाहीर

एमपीसी न्यूज :  शब्दधन काव्यमंचच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे काव्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रसिद्ध लेखक आणि निवेदक श्रीकांत चौगुले यांना (Pimpri News)  शब्दधन प्रतिभा पुरस्कार तर कवी हेमंत जोशी आणि कवी सुभाष चटणे यांना कवी अरविंद भुजबळ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

 

M.S. Dhoni : यंदाच्या आयपीएलनंतर धोनी होणार का निवृत? दीपक चहर म्हणाला..

 

ज्योती शिंदे ( रोहा, रायगड) स्वप्ना जगदळे ( नागपूर) दत्तात्रय खंडाळे( पुणे) शामला पंडित, मयुरेश देशपांडे, अरुण कांबळे, योगिता कोठेकर ( पिंपरी-चिंचवड)  यांना “छावा काव्य पुरस्कार” (Pimpri News) देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा लवकरच करण्यात येणार आहे, असे  शब्दधन काव्यमंचचे अध्यक्ष सुरेश कंक, उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, कोषाध्यक्ष तानाजी एकोंडे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.