Pimpri : शहीद भगतसिंग यांचे कार्य भावी पिढ्यांना देशभक्तीची प्रेरणा देत राहील

एमपीसी न्यूज – थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग (Pimpri) हे उत्तम वक्ते तर होतेच शिवाय ते मातृभूमीवर निस्सीम प्रेम करणारे प्रखर देशभक्तही होते, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी दिलेले योगदान सर्व भारतीयांच्या सदैव स्मरणात राहील आणि भावी पिढ्यांना देशभक्तीची प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त त्यांच्या दापोडी चौक येथील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
World Cup 2023 : विश्वचषकासाठी भारताचा अंतिम संघ जाहीर; रविचंद्रन अश्विनला संधी
त्यावेळी ते बोलत होते. अभिवादन प्रसंगी ह क्षेत्रीय अधिकारी उमेश ढाकणे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, (Pimpri) सामाजिक कार्यकर्ते सतीश काळे, वैभव जाधव,अशोक सातपुते तसेच नागरिक उपस्थित होते.