Pimpri : पहिला इंडियन सुपरहिरो ‘शक्तिमान’ 1 एप्रिलपासून प्रेक्षकांच्या भेटीला

एमपीसी न्यूज – लाॅकडाऊनमुळे घरातच अडकून पडलेल्या लोकांना मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नव्वदच्या दशकात गाजलेल्या मालिका पुन्हा सुरू करण्याचा जणू धडाकाच सुरू झाला आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने रामायण आणि महाभारत या मालिकांचे पुन्हा प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला,  त्यानंतर पहिला इंडियन सुपरहिरो म्हणून प्रसिद्धी मिळालेला ‘शक्तिमान’ सुद्धा 1  एप्रिलपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच्याच मनावर भुरळ घालणारा इंडियन सुपरहिरो ‘शक्तिमान’ ही मालिका तुफान प्रसिद्ध झाली होती. ही मालिका 13 सप्टेंबर 1997 ला सुरू झाली होती आणि 17 मार्च 2005 ला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.

शक्तिमानची भूमिका साकारणारे मुकेश खन्ना यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शक्तिमान या मालिकेचा सिक्वेल करण्याची आपली इच्छा आहे कारण शक्तिमान चे पुढे काय झाले हे लोकांना माहीतच नाही. आपण या मालिकेवर एक फिल्म  सुद्धा बनवण्याचा विचार करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दूरदर्शन वरती या मालिकेचे पुन्हा प्रक्षेपण होणार असून, 1  एप्रिलपासून दुपारी एक वाजता त्याचे प्रसारण केले जाणार आहे. ही मालिका  दररोज 1 तास एक  दाखवली  जाणार आहे. शक्तिमान ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे मुकेश खन्ना यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.