Pimpri: पीएमपीएमएल बसचे प्रश्न मार्गी लावू – शंकर पवार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पीएमपीएमएल बस संदर्भातील प्रश्न मार्गी लावले जातील, अशी ग्वाही पीएमपीएमएलचे नवनियुक्त संचालक शंकर पवार यांनी दिली.

पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवक असलेले शंकर पवार यांची नुकतीच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांच्या हस्ते पिंपरी महापालिकेच्या वतीने पवार यांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय रचनेमध्ये सभासद, पुणे महापालिका हे पदसिद्ध संचालक आहेत. तत्कालीन संचालक सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर शंकर पवार यांची कंपनी कायदा 2013 मधील तरतुदीनुसार पुणे महानगर परिवहन मंहामंडळ लि. पुणेच्या संचालक मंडळावर संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.