Pimpri : Shantanu Joshi यांनी वेबिनारद्वारे Mind Literate विषयी केले मार्गदर्शन

Shantanu Joshi gives lecture on Mind literate through webinar

एमपीसी न्यूज – ‘फॉग लॅम्प मिशन सेशन’तर्फे ‘माइंड लिटरेट’ या विषयावर 2 व 3 मे रोजी वेबिनार आयोजित करण्यात आले होते. व्यवस्थापन तज्ञ, अध्यात्मिक गुरू व मनुष्य स्वभाव विशेषज्ञ शंतनू जोशी यांनी या वेबिनार दरम्यान मार्गदर्शन केले.

वेबिनार असल्यामुळे देशातील व देशाबाहेरील अनेक ज्ञानार्थीना हा विषय जाणून घेता आला. ‘माइंड लिटरेट’ हा विषय हिंदी भाषेतून श्रोत्यांसमोर मांडण्यात आला.

मन म्हणजे काय ? मनाची कामे कुठली ?अशा महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे देऊन वेबिनार ची सुरवात झाली. मनाच्या क्षमता अमर्याद आहेत म्हणूनच मनाविषयी माहिती असणे गरजेचे आहे हे जोशी यांनी श्रोत्यांना पटवून दिले.

मनाला प्रेमाची व आपुलकीची गरज असते, आयुष्यभर आपले मन एका विशिष्ट वयाचे असते त्यामुळे आपला आपल्या मनाशी संवाद प्रेमयुक्त हवा हे सरांनी स्पष्ट केले. आपल्या बुद्धीने निर्णय घेऊन तो आपल्या मनाला सांगितला तर मन योग्य वाट शोधू शकते. यासाठी शंतनू जोशी यांनी विविध टेक्निक शिकवले.

मनाची वैशिष्ट्ये सांगून त्या वैशिष्ट्यांचा उपयोग आपले ध्येय गाठण्यासाठी कसा करून घेऊ शकतो हे विविध उदाहरणातून स्पष्ट केले. आपल्या मनाच्या कार्यपद्धतीचे प्रतिबिंब आपल्या कामाच्या दर्जामध्ये दिसते असा संदेश त्यांनी दिला. प्रश्नोत्तराच्या सत्रानंतर वेबिनार ची सांगता ध्यान करून झाली.

वेबिनारमुळे लॉकडाऊनच्या काळातही शंतनू जोशी यांचे मार्गदर्शन मिळणे शक्य झाल्याने श्रोत्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पुढील वेबिनार 16 मे रोजी ‘स्ट्रेस लिटरेट’ या विषयावर होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.