Pimpri : फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी शंतनू जोशी यांच्याकडून गिरवले उद्योजकतेचे धडे

एमपीसी न्यूज – स्टार्ट अप अँड इनोवेशन सेल अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ मायक्रो, स्मॉल अँड मेडीयम एन्टरप्रायझेस आणि एआयटी पिनाकल यांच्या  संयुक्त विद्यमाने उद्योजकता या विषयावर व्यवस्थापनतज्ज्ञ व मनुष्य स्वभाव विशेषज्ञ शंतनू जोशी यांनी पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शंतनू जोशी म्हणाले की, उद्योजक बनण्यासाठी सगळेजण बघत आहेत ते बघा, पण विचार असा करा जे दुसरे कोणी करत नाही. जो दुसऱ्यांचे आयुष्य सोपे करतो आणि स्वतःबरोबर इतरांना रोजगाराबरोबर उत्पन्न मिळण्याची व्यवस्था करतो तो उद्योजक असतो. उद्योजकता ही उद्योजकतेची मानसिकता शिकल्यावर विकसित होऊ शकेल, हे समजवून देण्यासाठी त्यांनी विविध वस्तूंचा उगम काय विचारातून झाला असेल, हे प्रात्यक्षिक देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

जोशी म्हणाले की, फिजिओथेरपी कन्सल्टिंग आणि उपचार पद्धतींमध्ये अजून आपण काय सुधारणा करू शकतो, हा विचार केल्यास आपल्याला या क्षेत्रात उद्योजकता विकसित करता येऊ शकेल, हा विचार विद्यार्थ्यांच्या समोर मांडला. कुठलीही नवीन मानसिकता विकसित करण्यासाठी मन शांत असणे गरजेचे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.

विषय समजावताना घेतलेल्या वेगवेगळ्या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ. तुषार पालेकर होते. सदर कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्राध्यापक डॉ. सीमा सैनी आणि डॉ.स्वप्नील सोनजे यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.