Pimpri : ऑटोक्लस्टर येथे मेडिकेशन टू मेडिटेशन या विषयावर शंतनू जोशी यांचे व्याख्यान 

एमपीसी न्यूज – नुकत्याच पिंपरी-चिंचवड च्या ऑटोक्लस्टर सभागृहात मदरली विस्डमद्वारे मेडिकेशन टू मेडिटेशन या विषयावर कार्यक्रम आयोजित केला होता. व्यवस्थापन तज्ज्ञ, मनुष्य स्वभाव विशेषज्ञ आणि अध्यात्मिक गुरु शंतनू जोशी यांनी या विषयावर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी व्यावसायिक, उद्योजक, नोकरदार तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. हा कार्यक्रम दोन सत्रात झाला. ध्यान म्हणजे नेमकं काय? ते कसं व का करावं हे शंतनू जोशी यांनी विस्तृतपणे सांगितलं.

ध्यान न करण्याची कारणे, येणाऱ्या अडचणी आणि त्यावर मात केल्यानंतर होणारे ध्यानाचे फायदे याची माहिती त्यांनी साध्या सोप्या प्रात्यक्षिकातून दिली.  प्रेक्षकांना सहभागी करून, त्यांना बोलतं करून हा अवघड विषय शंतनू जोशी यांनी नेमकेपणाने पोहोचवला आणि प्रेक्षकांच्या शंकांचं निरसन केले. दोन पद्धतीचे ध्यानप्रकार शंतनू जोशी यांनी करून घेतले. ध्यानामुळे शरिरात नेमका कसा बदल होतो आणि औषधीमुक्त कसे होता येते याचे प्रभावी विवेचन त्यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.