Pimpri: शरद पवार यांची पुन्हा ‘गुगली’; पार्थ नव्हे, इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल

सस्पेन्स वाढविला; मावळातील उमेदवार दोन दिवासांत उमेदवार जाहीर करु

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (बुधवारी) मावळ मतदारसंघातील बुथप्रमुख, कार्यकर्त्यांशी ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे, तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल. त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचा असा सल्ला देत पुन्हा एखदा गुगली टाकली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे.

मुंबईतील प्रदेश करार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. वाकड येथील यशोदा गार्डन मंगल कार्यालयात पार पडलेल्या या कॉन्फरन्सिंगला पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, नगरसेवक नाना काटे, मयूर कलाटे, माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर आदी उपस्थित होते.

  • “पार्थला नेते म्हणून दिले आहे, त्यांना मावळमधून 100 टक्के निवडून आणू’ कार्यकर्त्याच्या या वक्‍तव्यावर शरद पवार यांनी राजकीय गुगली टाकत, मावळचा राष्ट्रवादीचा उमेदवार अद्यापही जाहिर झालेला नाही असे सांगितले. तसेच येत्या दोन-तीन दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर करणार असल्याची सांगत मावळच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांकडून बूथ कमिटीच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच बूथ कमिट्यांच्या कामकाजात आणखी सुधारणा करण्याची गरज असल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.