Pimpri: शरद पवार यांनी कोरोना बाधित रुग्णांसाठी पालिकेकडे दिली रेमडेसिवीर इंजेक्शन

वायसीएम रुग्णालयातील कोरोना बाधित गोरगरीब नागरीकांसाठी आज 50 इंजेक्शन दिली. : Sharad Pawar gave Remedesivir injection to the municipality for corona infected patients

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना रोगावर सद्यस्थितीमध्ये प्रभावशाली ठरणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन शहरातील बाधित रुग्णांसाठी पिंपरी पालिकेला दिली आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी आज 50 इंजेक्शन दिली असून आगामी काळात आणखी इंजेक्शन देण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर आणि वायएसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडे इंजेक्शनचा बॉक्स सूपूर्द केला.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सातशे ते आठशेच्या पटीत कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत.

त्यामुळे शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. कोरोना हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे कोरोना बाधितांची संख्या इपाट्याने वाढत आहे.

कोरोना रोगावर सद्यस्थितीमध्ये प्रभावशाली ठरणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देण्यात येत आहे. प्रामुख्याने कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असलेल्या ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनस् देण्यात आली आहेत.

पिंपरी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील कोरोना बाधित गोरगरीब नागरीकांसाठी आज 50 इंजेक्शन दिली. अजूनही आणखी इंजेक्शन देण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.