Pimpri : समाजवादी पक्षाच्या शहर उपाध्यक्षपदी शरीफ उल्लाह अब्दुल समद खान

Sharif Ullah Abdul Samad Khan as the city vice president of the Samajwadi Party

एमपीसीन्यूज : फुले-शाहू-आंबेडकर व राम मनोहर लोहिया चळवळीचे खंदे समर्थक शरीफ उल्लाह अब्दुल समद खान यांची समाजवादी पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले आहे. खान यांनी अनेक वर्षे सामाजिक, शैक्षणिक, संस्कृती व राजकीय क्षेत्रात कार्य केले आहे.

फुले-शाहू-आंबेडकर व राम मनोहर लोहिया चळवळीसाठीही त्यांचे योगदान महत्वपूण आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दाखल घेत त्यांना समाजवादी पक्षात काम करण्याची संधी देण्यात आल्याचे कुरेशी यांनी सांगितले.

पदाच्या माध्यमातून समाजवादी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळात आणि वंचित समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात समाजवादी पक्षाचे संघटन वाढविण्याला प्राधान्य देणार असल्याचे खान यांनी निवडीनंतर सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.