Pimpri: महापौरपदीसाठी डावललेले भाजपचे शत्रुघ्न काटे यांची महासभेला अनुपस्थिती; पक्षादेश देऊनही दांडी

भाजपचे स्थानिक नेते हादरले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी डावलल्यामुळे पिंपळेसौदागरचे भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे हे महासभेला अनुपस्थित राहिले. सभागृह नेत्याने पक्षादेश (व्हीप) देऊनही त्यांनी दांडी मारली. तसेच भोसरीचे रवी लांडगे देखील अनुपस्थित राहिले. नाराज असल्यानेच त्यांनीही दांडी मारल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते हादरले आहेत.

शत्रुघ्न काटे महापौरपदासाठी इच्छुक होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. परंतु, त्यांना डावलण्यात आले. त्यांच्याएवजी जाधववाडीचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे राहुल जाधव यांना महापौर देण्यात आले. त्यामुळे नाराज झालेले शत्रुघ्न काटे यांनी महासभेला अनुपस्थितीत राहत आपली नाराजी दाखवून दिली. तसेच पक्षादेश देखील झुगारला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.