BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : पार्थ पवार यांच्या प्रचारात शेकापची आघाडी

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – पार्थ पवार यांच्या प्रचारात पिंपरी-चिंचवड शेतकरी कामगार पक्ष आघाडीवर असून प्रचारपत्रक काढून चिंचवड विधानसभा व पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात प्रचाराचा झंझावात केला. शहरातील कष्टकरी कामगार यांच्या मूलभूत प्रश्नांना हात घालून पार्थ अजित पवार यांना मतदान करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेतकरी कामगार पक्ष पिंपरी चिंचवड सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चिंचवड विधानसभा व पिंपरी विधानसभा कार्यक्षेत्रात स्वतः पत्र काढून संवाद साधला चिंचवड विधानसभा क्षेत्रातील सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, काटे पिंपळे, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड, थेरगाव, चिंचवड, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, रावेत या भागात जोरदार प्रचार केला.

तसेच पिंपरी विधानसभा अधिक क्षेत्रात पिंपरी गाव चिंचवड चिंचवड स्टेशन पिंपरी मार्केट लालबहादूर शास्त्री मंडई आकुर्डी काळभोरनगर निगडी प्राधिकरण भाग पिंजून काढला. शेतकरी कामगार पक्ष पिंपरी-चिंचवड अध्यक्ष नितिन बनसोडे महिला शहराध्यक्ष छायावती ताई देसले कार्याध्यक्ष हरीश आप्पा मोरे यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष भालचंद्र नाना फुगे, कोषाध्यक्ष राजेंद्र देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटक सुभाष साळुंके, चिंचवड विधानसभा राहुल पडवळ, पिंपरी विधानसभा परमेश्वर माने प्रभाग अध्यक्ष सीता जगताप, मंगल शेंडे, अश्विनी वाघमारे, सुनील लाड, गणेश सातपुते सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या प्रचार प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवला.

HB_POST_END_FTR-A4

.