Pimpri: भाजपच्या शीतल शिंदे यांचा अर्ज मागे ; विलास मडिगेरी यांच्या विजयाचा मार्ग सुकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदीसाठी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शीतल शिंदे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार विलास मडिगेरी यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती सभापतीपदासाठी आज (गुरुवारी) निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत भाजपचे बंडखोर शीतल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मडिगेरी यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मयुर कलाटे यांची उमेदवारी कायम आहे. मडिगेरी आणि राष्ट्रवादीचे मयुर कलाटे यांच्यात लढत होईल. स्थायीत भाजपचे बहूमत असल्याने मडिगेरी यांचा विजय निश्चित आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.