BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : दारू पिऊन विसर्जन मिरवणुकीत धिंगाणा घालणारा शिवसेना पदाधिकारी ताब्यात

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्याला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) रात्री मोहननगर येथे करण्यात आली.

विजय सुर्वे असे ताब्यात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांचे नाव आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुर्वे हा मोहननगर शिवसेना शाखाप्रमुख आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत सुर्वे याने दारू पिऊन गोंधळ घातला. याबाबत पिंपरी पोलिसांनी त्यावर कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. पिंपरी पोलिस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.