Pimpri : महाशिवरात्रीनिमित्त पिंपरीत साकारलं आठ फुटी शिवलिंग

एमपीसी न्यूज – विश्व सिंधी सेवा संघ यांच्यातर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्क आठ फुटी शिवलिंग साकारण्यात आले आहे. वीट, सिमेंट आणि लोखंडाचा वापर करून हे भव्य शिवलींग उभारण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त आठ फुटी शिवलिंगचे दर्शन घेण्यासाठी शहरातील लोक गर्दी करत आहेत.

पिंपरी येथील दुर्गा मंदिरासमोर उभारण्यात आलेले आठ फुटी शिवलिंग नागरिकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. विश्व सिंधी सेवा संघ यांच्यातर्फे महाशिवरात्रीनिमित्त चक्क आठ फुटी शिवलिंग साकारण्यात आले असून शिवभक्त शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्याप्रमाणात गर्दी करत आहेत. शिवलिंगावर अभिषेक करण्यासाठी स्टेज साकारण्यात आले असून दूध मिश्रित पाणी शिवलिंगावर अभिषेक म्हणून सोडण्यात येत आहे.

यानिमित्ताने शिवलिंगा भोवती १०८ दिव्यांची आरास करण्यात अली आहे तसेच पहाटे व सायंकाळी अशी दोन वेळा या शिवलिंगाची महाआरती करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त आठ फुटी शिवलिंगचे दर्शन घेण्यासाठी शहरातील लोक गर्दी करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.