BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri: ‘शिवभोजन’ योजनेला उद्यापासून सुरुवात, पिंपरीत ‘या’ चार ठिकाणी मिळणार शिवभोजन

एमपीसी न्यूज – गरीब आणि गरजूंना फक्त 10 रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या ‘महाविकासआघाडी’ सरकारच्या  ‘शिवभोजन’ योजनेची उद्यापासून  राज्यभरात अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील चार ठिकाणांची निवड केली आहे. महापालिका भवनाच्या आवारातील उपाहारगृह, वायसीएम हॉस्पिटल उपाहारगृह, वल्लभनगर एसटी स्टॅंड उपाहारगृह आणि पीसीएनटीडीएच्या आवारातील उपाहारगृहात शिवभोजन मिळणार आहे.

प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार असून, दिवसाला पाचशे व्यक्तींना सवलतीत भोजन मिळणार आहे. नागरिकांना दहा रुपयांत भोजन मिळणार असले. तरी, ते पुरविणाऱ्या संस्थेला राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. एका थाळीचा दर पन्नास रुपये ठरविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांना प्रतिथाळी चाळीस रुपये अनुदान दिले जाईल.

पिंपरी-चिंचवड शहरात ‘येथे’ मिळेल थाळी
पिंपरी महापालिका भवनाच्या आवारातील उपाहारगृहात 100 थाळी
वायसीएम हॉस्पिटल उपाहारगृहात 150 थाळी
वल्लभनगर एसटी स्टॅंड उपाहारगृहात 150 थाळी
प्राधिकरण कार्यालयाच्या आवारातील उपाहारगृहात 100 थाळी

…अशी असेल थाळी
दोन चपात्या (प्रत्येकी 30 ग्रॅम)
एक वाटी भाजी (100 ग्रॅम)
एक मूठ भात (150 ग्रॅम)
एक वाटी वरण (100 ग्रॅम)

शिवभोजनाची वेळ :दुपारी बारा ते दोन
भोजनालयासाठी निकष :- एकावेळी किमान 25 लोकांच्या जेवणासाठी पुरेशी जागा उपलब्ध हवी. शिळे किंवा खराब झालेले अन्न देऊ नये. स्वतःच्या कर्मचाऱ्यांना सवलतीत जेवण देऊ नये

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like