Pimpri : उद्योगनगरीत घुमला जय शिवाजी, जय भवानीचा जयघोष !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात तिथीप्रमाणे शिवजयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली. शहरात सकाळपासून शिवजयंतीचा उत्साह दिसून येत होता. मिरवणुक, सामाजिक उपक्रम, व्याख्याने आदी उपक्रम शहरभर घेण्यात आले. जय शिवाजी, जय भवानी जयघोषाने सारे शहर शिवमय झाले होते.

काळेवाडी परिसरातील तापकीरनगर येथे कै. हनुमंत तापकीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी स्वीकृत सदस्य विनोद तापकीर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक अभिषेक बारणे, निलेश तापकीर, नवीन तापकीर, जांभळे, डॉ. जाधव तसेच युवा प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शिवजयंती निमित्त विविध विधायक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, असे तापकीर यांनी सांगितले. शिवशाही व्यापारी संघाच्यावतीने शगुन चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक संदीप वाघेरे, गणेश आहेर, युवराज दाखले, जितेंद्र चौधरी, ओमकार नितनवरे, रमेश रायभुगे आदी उपस्थित होते. मोरवाडीत अखिल मोरवाडी शिवजयंती महोत्सव आकर्षक सजावट करण्यात आली. चिंचवडगावात काळभैरवनाथ उत्सव समितीच्या वतीने एक गाव एक शिवजयंती या उपक्रमांतर्गत आकर्षक सजवलेल्या पुष्परथात छत्रपतींचा पुतळा ठेवून मिरवणुक काढण्यात आली.

ह्युमन राईट फाऊंडेशनच्या वतीने एच. ए.कॉलनीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी विक्रम पवार, समाधान इंगवले, चिंतामणी देसाई, अभिजित पाटील, निलेश मालेकर, तुषार शेंडकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.