Pimpri : शिवणे, गहूंजेतील बंधा-याचे काम प्रगतीपथावर

एमपीसी न्यूज – पवना नदीवर (Pimpri) शिवणे तसेच मावळ तालुक्यातील गहूंजे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे काम प्रगतीपथावर आहे. त्यासाठी बंधारा बांधण्याच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

प्रशासक शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या महापालिका स्थायी समिती सभेत विविध विषयांना आज मान्यता देण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , जितेंद्र वाघ, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

महापालिका क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणे, विविध योजना नागरिकांना पर्यंत पोहचवणे या अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे इतर आवश्यक विविध कामांसाठी येणाऱ्या खर्चासही प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली. चिंचवड येथील जागा झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील झोपडीधारकांसाठी ट्रांझीट कॅम्प करिता तात्पुरत्या स्वरूपात भाडे तत्वावर देण्यास मान्यता देण्यात आली. मौजे चऱ्होली येथील मंजूर विकासयोजनेचे आरक्षण क्र. 2/62 गुरांचा पाणवठाचे भूसंपादन करण्यास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्रमांक 14 मध्ये डांबरीकरणची (Pimpri) कामे करण्यास मान्यता देण्यात आली. मनपाचे प्रभाग क्रमांक 19 मधील हिंदू स्मशानभूमी मध्ये स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली. मनपाचे प्रभाग क्रमांक 14 संत तुकाराम व्यापार संकुल आकुर्डी येथील इमारतीच्या देखभाल दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली.

Pimple Saudagar : रस्त्यांचे डांबरीकरण करा, नाना काटे यांची मागणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.